जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देऊन प्रती व्यक्ती 55 लिटर प्रमाणे शुद्ध, पुरेशे, व किफायतशीर दरात पाणी पुरवठा करणे. 2. गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालये,यांना नळजोडणी झाली किंव्हा नाही त्यांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत किंवा नाही याची माहिती घेणे. 3. ग्रामपंचायत ल भेट देऊन जलसुरक्षक अहवाल तपासणे व मार्गदर्शन करणे. 4. नळयोजना घेण्यासाठी ग्रामपंचायत मधील ग्रामसभेला उपस्थित राहून ग्रामसभेचे ठराव, योजनेकरीता टाकी व विहीर जागेचा सातबारा ,नकाशा इत्यादी कागदपत्रे उपविभाग ग्रामीण पाणी पुरवठा येथे सादर करणे. 5. गावातील ftk महिलांची निवड व प्रशिक्षण 6. गावात गृहभेट व कोपरा बैठक घेऊन कुटुंबांना नळजोडणी घेणे व लोकवर्गणी जमा करणे याकरिता प्रोत्साहित करणे . IEC करणे आधारकार्ड जमा करणे व ऑनलाईन नोंदणी करणे. प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रयोगशाळेला भेट देऊन पाणी नमुने नियमित जातात किंवा नाही याची माहिती घेणे.